सकल मराठा समाज बाळापुर च्या वतीने बावनकुळे यांना दाखवले काळे झेंडे
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली या गावात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज करून अनेक मराठा तरुण व भगिनींना जखमी केले या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज बाळापुर च्या वतीने अकोला ते खामगाव या नॅशनल मार्गावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संवाद यात्रेसाठी अकोला येथे जात असताना शेलद फाटा येथे त्यांना काळे झेंडे दाखवत समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 58 मोर्चे शांततेत शिस्तीत निघाले असताना सुद्धा जालना जिल्ह्यातील शांत संयमी मराठा आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या शासनाचा निषेध म्हणून सकल मराठा समाज बाळापुर यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना काळे झेंडे दाखवले सदर आंदोलनात देवानंद साबळे गोपाल पोहरे प्रशांत गायकवाड विष्णू अरबट ऋषिकेश साबळे अंकित डीवरे यासह अनेकांचा सहभाग होता
यावेळी सर्व आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात घोषणा दिल्याआंदोलनकर्त्यांना बाळापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन बाळापुर येथे दुपारी तीन वाजेपर्यंत बसून ठेवण्यात आले