भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या आढावा बैठकीत दोन संशयिता घेतले ताब्यात!
अकोला येथील हॉटेल तुषार मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लोकसभा संवाद आढावा बैठकीत दोन संशयितांना घेतले ताब्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अकोला येथील बाळापुर रोडवरील हॉटेल तुषार मध्ये लोकसभा संवाद आढावा बैठक सुरू असताना या बैठकीमध्ये दोन-संशयित विना पास आत मध्ये शिकले होते. यावेळी तेथील सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांना ती दोन व्यक्ती संशयित रित्या सदर बैठकीत बसलेले दिसले यावेळी त्यांना ताब्यात घेतले याबाबत पोलिसांना विचारणा केली असता सदर संशयित हे पॉकेट मार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.