खोलेश्वर रोड लक्ष्मी नगर खडाऊ जीन येथे अज्ञात व्यक्तीच्या तावडीतून गोवंशाला दिले जीवनदान…
अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या खोलेश्वर लक्ष्मी नगर मधील खटाऊ जिन येथे दोन अज्ञात व्यक्ती संशयास्पद असलेल्या गोवंशाला घेऊन जात असताना आढळून आले. यावेळी उपस्थित खोलेश्वर येथील गणेश सपकाळ यांनी या व्यक्तींना विचारपूस केली असता त्यांनी उडवा-उडवी चे उत्तरे दिली. आम्ही खामगाव बुलढाणा येथून ही गाय आणली असे सांगितले परंतु त्यांच्याकडे या गाई विषयी कुठल्याही प्रकारची पावती नसल्याने त्यांच्यावर संशय आला. कसून चौकशी सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती या ठिकाणाहून गोवंश गाईला सोडून प्रसार झाले. यावेळी उपस्थित गौ-रक्षक प्रेमी गणेश सपकाळ, रमेश गायकवाड सागर घनबहादुर,करण शाहू, आकाश गावंडे,उमेश लांडगे, संतोष जामनिक, कन्हैया सूर्यवास्तव, अंकित काटे ,रितिक खांडेकर ,सौरभ गुप्ता, यश पंडित इत्यादी गोरक्षक प्रेमींनी गोवंशला जीवदान दिले. यावेळी गणेश सपकाळ यांनी याबाबत सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली असता पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप सोनवणे बक्कल नंबर 47 आणि संतोष दामोदर बक्कल नंबर 2381 यांनी याप्रकरणी घटनास्थळ घाटून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.