कवठा गावात बिबट्याचे दर्शन गावकर्यांमध्ये भितीचे वातावरण!
कवठा …..कवठा गावानजीक मन नदिवर धरण असुन या धरणाजवळील दाट काटेरी झुडुपांमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे गावकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असुन वनविभागाने तात्काळ या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावानजीक धरणामुळे पाणी साचलेले असुन या पाण्याच्या शोधात व दाट काटेरी झाडांमध्ये बिबट्याचे लपुन असल्याचे दिसुन आले आज सायंकाळी बकर्या चराईकरीता गेलेल्या काही नागरीकांना दाट झाडीच्या बाहेर बिबट्या वावरतांना दिसला. यामुळे गावकरी भयभित झाले असुन शेतात कामाकरीता जाणार्या महीला मजुर वर्गामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे वनविभाच्या अधीकिर्यांनाॉ या बिबट्याला जेरबंद करून गावकर्यांची बिबट्याच्या दहशतीपासुन सुटका करावी अशी मागणी होत आहे
विलास बोरचाटे
कवठा