स्वप्निल राऊत यांची काँग्रेस सोशल मीडिया विभागात अकोला जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती
मनोज भगत – हिवरखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया विभागाचे चेअरमन विशाल मुत्तेमवार यांनी हिवरखेड युवक काँग्रेसचे स्वप्निल अशोकराव राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यांच्या युवक काँग्रेस मधील केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना बढती देण्यात आली आहे. सध्याच्या राजकारणाचे बदलते स्वरूप पाहता सोशल मीडियाचे वाढलेले महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. म्हणूनच सोशल मीडिया चे महत्व लक्षात ठेवून पक्षाचे कार्यक्रम आणि विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचविण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. सदर नियुक्ती ही नागपूर येथील आयोजित सत्याग्रह शिबिरात करण्यात आली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सुनील केदार, प्रभारी नितीन अग्रवाल, आमदार अभिजीत वंजारी, अमरावती विभागीय समन्वयक श्लोकानंद डांगे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वप्निल राऊत हे आपल्या नियुक्तीचे श्रेय जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर प्रदेश सचिव प्रकाश तायडे, जीशान हुसेन,प्रशांत गावांडे, निनाद मानकर,महेश गणगने, विजय देशमुख प्रकाश वाकोडे,अफरोज भाई .यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना देतात. राहुल गांधी यांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करेल असे आश्वासन स्वप्निल राऊत यांनी उपस्थितांना दिले.