ये जनता की ललकार बंद करून भ्रष्टाचार!
नागरिकांनी म्हणत एक सही संतापाची ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
गांधी चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे एक सही संतापाची या आंदोलनात सह्या करून नागरिकांनी केला संताप व्यक्त!
महापालिकेने खाजगी कंपनीला देण्यात आलेल्या टॅक्स वसुलीच्या कंत्राटामुळे अकोला शहरातील नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान वाचवण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वातील गांधी चौक येथे एक सही संतापाची या आंदोलना आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी आठव्या दिवशी नागरिकांनी टॅक्स विरोधात या आंदोलनात सह्या करून आपला विरोध दर्शविला आहे. अकोला महानगरपालिकेच्या वतीने तसेच लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने खाजगी कंपनीला टॅक्स वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे जर कंपनीचा व्यक्ती टॅक्स मागण्या करिता आपल्याकडे येत असेल तर त्याला टॅक्स न देण्याच्या आव्हान यावेळी शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केले आहे. तसेच यासंबंधी आपल्याला कोणी त्रास देत असेल तर आम्हाला फोन करून अवश्य बोलवा असेही आव्हान यावेळी करण्यात आले.आज गांधी चौकामध्ये ये जनता की ललकार बंद करून भ्रष्टाचार
नागरिकांनी म्हणत एक सही संतापाची ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.