श्री गणेश विसर्जनाची ऐतिहासिक मिरवणूक अनंत चतुर्दशी दिनीच ईद मिलादुन्नबीचा जुलूस श्री विसर्जनाच्या दोन दिवसानंतर
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक एकमुखी निर्णय
अकोला- अकोला-महानगरातील गणेश मंडळाचे गत 130 वर्षांपासून सुयोग्य संचालन व व्यवस्थापन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय कमिटीच्या झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी 28 सप्टेंबर रोजी येत असणाऱ्या गणेशोत्सवाची श्री विसर्जन मिरवणूक आपल्या निर्धारित तिथीस दि 28 सप्टेंबर रोजी होणार असून या दिनी येत असणाऱ्या ईद मिलादुन्नबीचा जुलूस हा दोन दिवसानंतर दिनांक 30 सप्टेंबर रोजी आपल्या पारंपारिक मार्गाने निघणार असल्याची घोषणा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तथा ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्याच्या वतीने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यंदा अनंत चतुर्दशी दि 28 सप्टेंबर च्या दिनी मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद मिलाद हा सण येत असल्यामुळे दोन्ही समाजाच्या वतीने समाजात सामंजस्य, शांती व सौहार्दता निर्माण होऊन हिंदू -मुस्लिमांचे हे दोन्ही सण आनंदाने पार पाडता यावेत. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष एड.मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम व कच्ची समाज व कच्ची मस्जिदचे अध्यक्ष जावेद जकारिया आदींनी पाठपुरावा करीत मुस्लिमांची सर्वोच्च संस्था दारुल उलूम अहले सुन्नत कार्यालयात गणेशोत्सव मंडळ व मुस्लिम समाजाच्या सामाजिक पुढारी व उलेमांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निर्णयाला जिल्ह्यातील सर्व उलेमा व मौलवीनी पाठिंबा दर्शवीत मुस्लिम समाज हा गणेश विसर्जनाच्या दोन दिवसानंतर दि 30 सप्टेंबर रोजी महानगरात आपली पारंपारिक ईद मिरवणूक काढणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा सोमवारी स्थानीय ग्रीनलँड कॉटेज येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष एड मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, कार्याध्यक्ष हरीश अलीमचंदानी,संग्राम गावंडे,मंडळाचे पदाधिकारी विजय जयपिल्ले, एड सुभाषसिंह ठाकुर, विजय तिवारी,मनोहर पंजवानी, रमाकांत खेतान, मनोज खंडेलवाल तथा ईद मिलादुन्नबी जुलुस कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम,सैयद जकीमिया नक्शबंदी, मुफ्ती ए अकोला मुफ्ती गुलाम मुस्तुफा,हाफिज अकील मिज़बाईन, सैयद शहनवाज खादिम जुल्फिकार बाबा दरगाह,मौलाना अयूब, मौलाना अफ़रोज़,मौलाना शम्स तबरेज खान,कच्छी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद ज़कारिया आदी समनव्यन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान श्री विसर्जनाच्या दिने ताजनापेठ येथे सकल मुस्लिम समाजाच्या वतीने श्री मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ही गांधी चौक येथे ईद मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दोन्ही समाजात हिंदू मुस्लिम भाव वृद्धिंगत व्हावा, दोन्ही समाजाच्या मनातील जळमट दूर व्हावे, सामाजिक सौहार्दता, सामजिक शांती,कायदा व सुव्यवस्था व दोन्ही समाजात असलेले सलोख्याचे संबंध पुन्हा वृद्धिंगत व्हावे यासाठी हा अभिनव उपक्रम साकार करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्री मिरवणूक ही दिनांक 28 सप्टेंबर रोजी जय हिंद चौक येथून प्रारंभ होऊन ती सरदार पटेल चौक, अगरवेस,दगडी पुल,विर हनुमान चौक, तपस्वी बाबा चौक, नागपुरी जीन, कॉटन मार्केट,तिलक रोड, मंगलदास मार्केट, दीपक चौक, तेलीपुरा मार्गे कच्ची मज्जिद, ताजनापेठ येथे येऊन यानंतर सराफ बाजार, गांधी चौक, सिटी कोतवाली मार्गाने गणेश घाट येथे या श्री विसर्जन मिरवणुकीचे समापण होणार आहे.येथून मोठी मंडळे आपापल्या परीने काटेपूर्णा, बाळापुर येथे जाऊन श्रीच्या मोठ्या मुर्त्यांचे विसर्जन करणार आहेत. त्याचप्रमाणे दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्थानीय ताजनापेठ पोलीस चौकी पासून मुस्लिम समाजाच्या भव्य ईद-मिलाद मिरवणूकीस आपल्या पारंपरिक मार्गाने प्रारंभ होणार आहे.हा उत्सव जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन व समाजाचे जेष्ठ पदाधिकारी, उलेमा मौलवी आदींच्या उपस्थितीत होणार असून हिंदू -मुस्लिमांच्या भावना जोपासणाऱ्या या दोन्ही मिरवणुकीत दोन्ही समाजाने सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी नीरज शहा, संतोष पांडे,मनोज शाहू ,मनीष हिवराळे, जयंत सरदेशपांडे,एड सौरभ शर्मा,मंगेश काळे, संतोष अग्रवाल, गोपाल नागपूरे, दिनेश तिवारी,दिलीप खत्री, अॅड,सुरेश ढाकोलकर, संजय गोटफळे, यश मोहता, रामहरी डांगे,कैलास रणपिसे,राजेश चंदनबटवे, परेश मिश्रा,विक्की कोथळकर,विक्की ठाकूर व ईद मिलादुन्नबी जलसा कमिटीचे जहरूर इस्लाम बाळापुर, मुक्ती आरिफ रजा, मौलाना हाफिज अकील ,हाफिज मकसूद, मौलाना अबुल कादिर, हाफिज इस्माईल सामी, हाफिज आयुब, सय्यद शहानवाज, हाफिज मुशरफ,मौलाना इस्माईल,जावेद तेली,कलिम खान,राजीक खान समवेत ईद मिलादुन्नबी जलसा कमिटी तथा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.