सणांच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवा –  पोलीस अधिक्षक संदीप घुगे

सणांच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवा –  पोलीस अधिक्षक संदीप घुगे

अकोला, दि. 5 : सणांच्या काळात जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी पोलीस अधिका-यांना दिले आहेत.

जिल्ह्यात दि. 6 सप्टेंबरला गोकुळाष्टमी, दि. 7 सप्टेंबरला दहिहंडी, दि. 8 सप्टेंबरला गोगानवमी, दि. 11 सप्टेंबरला कावड, पालखी उत्सव मिरवणूक, दि. 14 सप्टेंबरला पोळा, दि. 15 सप्टेंबरला करिदिन, दि. 19 सप्टेंबरला श्री गणेश स्थापना उत्सव साजरा होणार आहे. या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक व त्याहून वरील दर्जाच्या अधिका-यांना मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

त्यानुसार उपासना, मिरवणूक मार्ग, सार्वजनिक ठिकाणे आदी परिसरात चोख बंदोबस्त ठेवणे, मिरवणुकांचे मार्ग निश्चित करणे, कुठेही अडथळा होऊ न देणे, सर्व उत्सव शांततेत पार पडतील यासाठी योग्य कार्यवाही करणे आदी आदेश देण्यात आले आहेत.

admin

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news