सकल मराठा समाजा तर्फे जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन!
मराठा आरक्षण आंदोलकांवरील अमानुष लाठीहल्ल्याचे निषेधार्थ सकल मराठा समाजा तर्फे शुक्रवार दि. ८ सप्टेंबर रोजी अकोला शहर व जिल्हा बंदचे आवाहन!

अकोला – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गांवात मागील एक आठवड्या पासून मराठा आरक्षणाच्या मागणी साठी शांततामय मार्गाने गावकऱ्यांचे उपोषण सुरु आहे. सदर आंदोलन दडपण्या करीता पोलीसां कडून आंदोलन कर्त्यांवर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. त्यात स्त्रिया व लहान मुलांसह शेकडो आंदोलन कर्ते जखमी झाले आहेत. या हल्ल्याचे निषेधार्थ व आदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच या लाठीहल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सकल मराठा समाज अकोला तर्फे आज जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना. सकल मराठा समाजा तर्फे निवेदन देण्यात निवेदनात शुक्रवार दि. ०८ सप्टेंबर २०२३ रोजी अकोला शहर व संपूर्ण अकोला जिल्हा बंद चे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी स्थानिक मराठा सेवा संघाच्या कार्यालयात सकल मराठा समाजाच्या सर्व संघटनांची सभा घेण्यात आली त्यात हा बंदचा निर्णय घेण्यात आला. अकोला शहर व जिल्हा १००% बंद करण्यासाठी सर्व सामाजीक संस्था, व्यापारी वर्ग / संघटना, शैक्षणिक संस्था, सर्व लहान मोठे व्यावसायीक यांनी सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाज तर्फे करण्यात आले आहे.
सदर बंद अतिशय शांततापूर्ण वातावरणात पाळण्यात येणार असून या बंद दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पुरेपुर खबरदारी घेण्यात येणार आहे. या बंदला सहकार्य करण्यासाठी सकल मराठा समाजा तर्फे सर्व व्यावसायीक व शिक्षण संस्था आदिंना पत्राचे वितरण करण्यात येणार आहे.
भविष्यात कोणत्याही समाजाच्या आंदोलना बाबत असा अनुचीत प्रकार घडू नये याचाही इशारा या बंद च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. करीता सर्व सामाजिक संघटना, संस्था, व्यापारी वर्ग, शैक्षणिक संस्था व नागरिक बंधु भगिनिंनी या एक दिवसीय बंद ला सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाज अकोला तर्फे करण्यात आले आहे.