अकोल्यात बलोदे ले आऊट येथे आईनेच घेतला चिमुकलीचा जीव !
अकोल्यातील बलोदे ले आऊट मधील खळबळ जनक घटना समोर आली आहे. एका मुलीच्या नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव एका आईनं केला व त्यामध्ये मुलगी गुदमरून मृत्यू पावली असा बनाव केला.पण, वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीची आईला ताब्यात घेतले आहे. दरम्यान अकोला शहरातील बलोदे लेआऊटमधील ही घटना आहे. किशोरी रवी आमले वय वर्ष पाच असं मृत मुलीचं नाव असून विजया आमले असं मारेकरी आईचं नाव आहे. या संदर्भात वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्या वेळी घरात कोणी असतानाच आईनं तिचा काटा काढला असल्याचं समोर आलंय आहे. याबाबत ठाणेदार यांनी प्रतिक्रिया दिली.