एसटी वर्कशॉप परिसरात बालकथाकार पंडित कृष्णाजी दुबे यांच्या माता सती शिव महापुराण कथेचे आयोजन
दिनांक 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत राहणार भक्तीचा सागर
अकोला – संपूर्ण विदर्भात अल्पावधीत आपल्या ओज्वस्वी वाणीने भक्तिमय वातावरण निर्माण करणाऱ्या व काशी येथून विद्या पारंगत बालकथाकार पंडित कृष्णाजी दुबे यांच्या माता सती शिवमहापुराण कथेचे आयोजन महानगरात करण्यात आले आहे. बालकथाकार कृष्णाजी दुबे यांनी विदर्भातील अनेक जिल्ह्यात आपल्या कथा करून भक्तिमय वातावरण
निर्माण केले आहे. सणासुदीच्या या दिवसात नागरिकांना भक्तिमय वातावरण प्राप्त व्हावे, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात व सत्संगाचा लाभ व्हावा यासाठी कौलखेड रस्त्यावरील एसटी वर्कशॉप परिसरात दिनांक 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत नित्य दुपारी 1 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पंडित कृष्णाजी दुबे यांची माता सती शिव महापुराण कथा होणार आहे. मुख्य यजमान तथा ज्येष्ठ समाजसेवी रामप्रकाश मिश्रा तथा हरीओम मंडप डेकोरेटर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सात दिवशीय कथेत बालकथाकार पंडित कृष्णाची दुबे माता सती यांच्या अवतार कार्याची संगीतमय कथा शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून प्रतिपादित करणार आहेत. या भव्य उत्सवाची तयारी जोमाने सुरू असून सणासुदीच्या या धार्मिक पर्वात नागरिक व भक्तांनी या सात दिवशीय माता सती शिव
महापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य आयोजक रामप्रकाश मिश्रा, यजमान अनिल काकड, सौ मीना काकड समवेत समस्त आयोजन समितीने केले आहे.