शिवराज गावंडे आत्महत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची शरद प्रतिष्ठानची मागणी

शिवराज गावंडे आत्महत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची शरद प्रतिष्ठानची मागणी

पोलिसांच्या धमकावण्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप

अकोला- अकोट येथील रहिवाशी शिवराज प्रकाशराव गावंडे याने पोलिसांच्या जाचाला कंटाळुन दि. १९-०८-२०२३ रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही आत्महत्या शिवराजने पोलिसी ज्याच्याला व सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून केली असून या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची चौकशी करून या प्रकरणाचा तपशील जाहीर करण्याची मागणी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदू बंड व मृतुकाची आई श्रीमती नलिनीताई गावंडे यांनी केली.स्व. शिवराज प्रकाशराव गावंडे हा गेली बारा वर्ष शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठांनच्या माध्यमातून वेगवेगळया सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होउन सामाजिक कामाद्वारे समाजाची सेवा करत होता.त्याने आपला मोठा भाऊ वारल्यावर दोन मुली असलेल्या वहिनी सोबत विवाह करुन घराला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला व मोठया भावाच्या दोन्ही मुलींना वडिलांचे प्रेम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दि. २६-०४-२०२३ रोजी शिवराज गावंडे यावर बाळापूर मार्गावर वाहन अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

येथूनच या प्रकरणात काही काळेबेरे होऊन अपघातग्रस्त दुचाकीचा नंबर खोटा देऊन गुन्हा दाखल केला.तसेच अपघाताच्या दिवशी सदर दुचाकी ही अकोला शहरातच नव्हती तरी यात जुने शहर पोलिसांनी गुन्हे नोंदवून मृतक शिवराज गावंडे यास पैश्याची मागणी करीत धमकावण्याचे प्रयत्न सुरू केले.तपासी अंमलदार यांनी या प्रकरणात शिवराज सोबत आर्थिक व्यवहार केला व बाकी पैसे दिले नाही तर तुला नोकरी कशी लागते तेच बघतो अशी धमकी दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आत्महत्या प्रकरणात अनेक विसंगती आढळून येत असून अपघातग्रस्त दुचाकी ही गजानन भुजंगराव कुलट यांच्या मालकीची होती. मात्र पोलिसांनी शिवराज यांच्यावरच गुन्हे दाखल केले.तपासी पोलीस अधिकारी यांनी शिवराज गावंडे यांच्याकडून अटक टाळायची असेल तर तीस हजार रुपये देण्याची मागणी केली त्यातील शिवराज ने पंचवीस हजार रुपये तपासी अंमलदार यांना दिले असल्याचे सांगण्यात आले.अश्या अधिकाऱ्यामुळेच शिवराजला आत्महत्या करावी लागली. सबब या प्रकरणातील तपास अधिकारी यांचा एप्रिल 2023 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंतचा सीडीआर काढून त्यातील सत्यता पडताळून बघण्याची मागणी यावेळी करण्यात आली.या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात येऊन निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ,खा सुप्रिया सुळे,रोहित पवार ,आ अमोल मिटकरी आदींनाही पाठविण्यात आल्या असून असून जर पोलीस प्रशासनाने यावर त्वरित निपक्षपाती चौकशी करून दोषी व्यक्तीवर गुन्हे नोंदवले नाहीत तर येत्या पंधरा दिवसात शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असून न्यायालयाचे दरवाजे ही ठोकण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्रकाश कोहळे, शेखर पाटील, श्याम लंगोटे ,कोकाटे सर आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news