शुद्ध हवा दिनानिमित्त अकोला मनपाने पाळला ” नो व्हेईकल डे”
निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा दिवसानिमित्त मनपा आयुक्त कविता द्विवेदी खुद्द आल्या पायी.
अकोला पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता व वायु प्रदुषण – कमी करण्याकरिता शासनातर्फे शुद्ध हवा दिन पाळण्यात येतो. या शुद्ध हवा दिन अकोला मनपाने नवीन पद्धतीने साजरा करीत संपूर्ण महानगरपालिकेतील कर्मचान्यांना “नो व्हडकल ड” पाळण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्या आदेशानुसार खुद्य आयुक्त सुद्धा आपल्या बंगल्यापासून अकोला मनपापर्यंत पायी येतांना दिसल्यामुळे अकोलकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच ऐरवी दुचाकी, चारचाकी द्वारे येणारे अधिकारी सुद्धा कोणी सायकलदार, पायी अकोला मनपामध्ये आले. यावेळी मनपाच्या आवारामध्ये सकाळी १०:३० वाजता सामुहिकरित्या पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्तांनी आपल्या अधिनस्त कर्मचान्यांना यावेळी विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मनपातील सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.