मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अकोला जिल्ह्याच्यावतीने आज अकोला जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी पाठिंबा घोषित केला आहे. दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने अकोला शहरात मोटार सायकल रैली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एका नावरदेवाने लग्न मंडपात जाण्याआधी मोर्चात आपला सहभाग नोंदवला.