मराठा आरक्षण आंदोलकांवरील अमानुष लाठीहल्ल्याचे निषेधार्थ सकल मराठा समाजा तर्फे अकोला शहर व जिल्हा कळकळीत बंद!
अकोला – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गांवात मागील एक आठवड्या पासून मराठा आरक्षणाच्या मागणी साठी शांततामय मार्गाने गावकऱ्यांचे उपोषण सुरु आहे. सदर आंदोलन दडपण्या करीता पोलीसां कडून आंदोलन कर्त्यांवर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. त्यात स्त्रिया व लहान मुलांसह शेकडो आंदोलन कर्ते जखमी झाले आहेत. या हल्ल्याचे निषेधार्थ व आदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच या लाठीहल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सकल मराठा समाज अकोला तर्फे आज अकोला शहर व जिल्हा १००% बंद ठेवण्यात आले. सामाजिक संस्था, व्यापारी वर्ग / संघटना, शैक्षणिक संस्था, सर्व लहान मोठे व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी सकल मराठा समाजा तर्फे महिलांनी जिल्हाधिकारी निवेदन निवेदन दिले. या बंदमध्ये विविध संघटनेने सहभाग घेतला होता.