जिल्हा न्यायालय समोर आईस्क्रीमच्या गाडीला आग!
अकोला शहरातील जिल्हा न्यायालयासमोर भर रस्त्यावर फालुदा आईस्क्रीम च्या गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे एकच धावपळ उडाली. विशेष म्हणजे ही गाडी रेल्वे स्टेशन कडून नवीन बस स्टॅन्ड कडे येत होती. अचानक ही गाडी जिल्हा न्यायालयासमोर येतात गाडीने अचानक पेट घेतला. न्यायालय असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. स्थानिक नागरिकांनी सदर आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. थोड्याच वेळा नंतर अकोला महानगरपालिकेची अग्निशामक विभागाची गाडी पोचल्यामुळे सदर आगेवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.