डाबकी रोड येथून निघाली डाबकीरोड वासी यांची दोन हजार शंभर भरण्याची कावड पूर्णाचे जल आणायला…
श्रावणातील चारही सोमवार आणि शेवटच्या सोमवारी अकोल्यात होणारी राजेश्वराच्या कावड यात्रेचं महत्व अकोलेकरांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्रपूर्व काळाची पार्श्वभूमी असलेल्या विदर्भातील अकोल्याच्या प्रसिद्ध कावड यात्रेला ७५ वर्षांची परंपरा आहे.
राजेश्वरभक्त जलाभिषेक करून श्री राज राजराजेश्वराला उत्कर्षासाठी साकडं घालतात. मोठी विशाल कावड हे या कावड यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं अशीच मोठी कावड जी दोन हजार शंभर भरण्यांची कावड ही अकोल्यातील जुन्या शहरातून डाबाकी रोड येथून डाबाकी रोड वासीयांनी काढली ही कावड गांधीग्राम येथे पुरणा नदीचे पाणी आणून उद्या श्री राज राजेशवराला जलाभिषेक करणात आहेत.