पातूर शहरात गाजणार “शहनाज” चा भगवा !
श्री.तपे हनुमान व्यायाम शाळेचा भव्य कावड समारोह
पातूर : दरवर्षा प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री.काशी कवळेश्वर महाराजांचा जलाभीषेक करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर येथील भीमा नदीचे जल घेवुन भव्य अशी कावड शोभायात्रा श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी दि.11/09/2023 रोजी पातूर शहरात दाखल होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन श्रावन महीन्यात पातूर येथील श्री.काशी कवळेश्वर महाराजांच्या पींडीचा जलाभीषेक करण्यासाठी शहरातील श्री.तपे हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष अनंत उर्फ बालुभाऊ बगाडे यांच्या वतीने भारतभरात प्रमुख ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणाहून पायदळी कावडद्वारे जल आणण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू असून मागील काही वर्षांत ओंकारेश्वर,उज्जैन,श्रीशैलम,त्र्यंबकेश्वर,घृष्णेश्वर,परळी वैजनाथ,औंढा नागनाथ येथून पायी यात्रा करून कावडीद्वारे जल आणण्यात आले असून यावर्षी भिमाशंकर ते पातूर (नानासाहेब) पर्यंतचा पायदळ प्रवास करून श्रावणाच्या चौथ्या सोमवारी सदर कावड पोहचणार असून पातूर शहरात भोलेनाथाच्या गजराने आसमंत दुमदुमूनार आहेच पण या कावड यात्रेचे विशेष आकर्षण प्रसिद्ध गायिका ‘ये भगवा रंग’ फेम शहनाज अख्तर यांच्या भक्तीगीतांचा जंगी कार्यक्रम आयोजित असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बारा ज्योर्लिंगांपैकी सात धाम करून यावर्षी भीमाशंकर ते पातूर असा आठवा धाम पूर्ण करीत ही भव्य स्वरूपाची कावड पातूर शहरातील टीकेव्ही चौक येथून बाळापूर रोडमार्गे,जुने बस स्थानक,पोलीस स्टेशन चौक,मिलिंद चौक मार्गे संभाजी चौक येथे येणार असून संभाजी चौकात भव्यदिव्य मंचावर प्रसिद्ध भक्तीगीत गायिका शहनाज अख्तर यांच्या गितगायनाचा कार्यक्रम होणार असून मान्यवरांच्या स्वागत समारोहाचे आयोजन केले आहे.यावेळी प्रमुख उपस्थितीत आमदार संजय कुटे, आमदार रणधीर सावरकर,कृष्णा अंधारे,किशोर मांगटे पाटील,जयंत म्हैसने,बाळकृष्ण बायस्कर संचालक श्रीकृष्ण कन्स्ट्रक्शन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,तसेच प्रमुख आकर्षण म्हणून प्रख्यात गायिका शहनाज अख्तर यांचा भव्य कार्यक्रम राहील.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा