हिवरखेड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
मनोज भगत
हिवरखेड
हिवरखेड येथील डॉक्टर सय्यद वाजीदअली यांचे अली क्लिनिक मध्ये रब्बी उल अव्वल च्या मुहूर्तावर दिनांक 17 सप्टेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरहू शिबिरात अकोला येथील सुप्रसिद्ध सहारा हॉस्पिटलचे आर्थो पेडिक डॉक्टर अंकुश कराळे व सुप्रसिद्ध महिला रोग तज्ञ व प्रसुती तज्ञ युनिक हॉस्पिटलच्या डॉक्टर सौ. प्रीती अंकुश कराळे हे हाड, मनके, सांधे व स्त्रियांचे आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करतील. सदरहू कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिवरखेड येथील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर बी. एम. कोरडे हे असतील तर शिबिराचे उद्घाटन प्रतिभा साहित्य संघाचे तालुका अध्यक्ष महेंद्र कराळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.तर प्रमुख उपस्थिती म्हणून हजरत मौलाना अब्दुल शकूर कासमी साहब , डॉक्टर शकील अली मीरसाहेब , डॉक्टर प्रमोद अरबट , डॉक्टर अजय मानकर , राजूभाई खान हे लाभणार आहेत. अली क्लिनिकचे डॉक्टर सैय्यद वाजिद अली यांनी आयोजित केलेल्या मोफत रोग निदान शिबिरात नाव नोंदणीसाठी धनंजय गावंडे , मुजाहिद अली, विकास गायकी पाटील , सैय्यद वकारअली , नाशिदअली , शेख शहजाद यांच्याशी किंवा अली क्लिनिक येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.