अस्तित्व फाउंडेशन द्वारे शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळां नी:शुल्क गरीब आणि गरजू मुलांसह घेण्यात आली

अस्तित्व फाउंडेशन द्वारे शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळां नी:शुल्क गरीब आणि गरजू मुलांसह घेण्यात आली

दिनाक : १० सप्टेंबर

लवकरच गणपती उत्सव येत आहे प्रत्येक घरी गणपती बाप्पा मोठ्या उत्साहाने बसवले जातात आनंदाने उत्सव साजरा होतो पण दहाव्या दिवशी काय मूर्ती पाण्यात विसर्जित करायची!! मुद्दा विसर्जनाचा नाही तर मूर्ती ज्या पीओपी पासून बनली आहे पूर्वी काळी मुर्त्या मातीच्या असायच्या त्यामुळे पर्यावरणाला हानी नाही पोहोचायची पण कालांतराने या मुर्त्या पीओपीच्या बनल्या त्यामुळे याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे तर आपण घरी पीओपीच्या मुर्त्यांना नाही तर मातीचाच मुर्त्या बसवायला हव्या ज्यांनी आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करू असा संदेश देत “अस्तित्व फाउंडेशनने” दिनांक १० सप्टेंबरला एक शाडू माती गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतली .
ही कार्यशाळा राष्ट्रीय शाळा मोठी उमरी इथे वेळ २ ते ४ या वेळेत घेण्यात आली.
या संस्थे चे पदाधिकारी गौरव मौर्य , गुंजन हिंगे, पीयूष खंडारे, निलेश महिसने ,करून मोरे हे आहेत या मध्ये पीओपी मुक्त म्हणजे शाळू मातीचा वापर करून गणपती बनवण्याचा उपक्रम राबंवला आहे. या कार्य कर्मा साठी कलाकार अंकुश चौधरी, राम सोनटक्के, प्रदीप वाईकर, प्रतीक्षा काकड , विपुल बढे, रोहित चौधरी, देविदास दलाल उपस्थित होते तसेच बासरीवादक आशिष उमाळे , सप्नील उमाळे उपस्थित होते. तसेच अस्तित्व फाउंडेशन चे स्वयंसेवक देखील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news