जालना येथील घटनेच्या निषेधार्थ चोहोटा बाजार येथिल बदला कुणबी समाजाचाही पाठिंबा…….
अकोट तालुका प्रतिनिधी प्रकाश बघे
जालना येथिल घटनेचा ,निषेधात चोहोटा बाजार येथे सर्कल मराठा समाजाच्या व सर्व पक्षीय समितीच्या वतीने करण्यात आले होते…. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तसेच जालना येथील घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो असे घोषणाबादी करत मोर्चा मध्ये सहभागी होऊन , पाठिंबा दिला, आज चोहोटा बाजार येथे.अंतरवरी मराठी गावात झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय व स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने 12 सप्टेंबर रोजी चोहोटा बाजार येथे कळकळीत् बंदचे आव्हान केले होते.त्या बंदला सहकार्य करत सर्व बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवून सर्वांनी स्वयंपूर्ण सहकार्य केले .अकोला जिल्हाप्रमुख स्वाभिमानी मराठा महासंघ ज्ञानेश्वर पाटील मोडक व सर्वपक्षीय नेते उपस्थित होते या बनला होता येथील दुकानदारांनी उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला, कुनबी समाजातील नेते,डाक्टर, पुरुषोत्तम दातकर, मनोहर शेळके, डाक्टर मनोहर चाकोते,डाक्टर विजय म्हैसने,गोपाल म्हैसने, दिलीप लेलेकर,राजु,मगळे,भोकरे पाटिल सह कुनबी व ओबीसी समाजातील नेते मंडळी या मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दिला.