निवडणूकीचे गांभिर्य लक्षात घेता पर्यवेक्षक व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांनी कामाची गती वाढवावी – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्त तथा प्रशासक .
अकोला दि. 13 सप्टेंबर 2023 – मा.राज्य निवडणूक आयोग यांचे दि. 14 जुलै 2023 चे पत्रानुसार विधानसभेच्या मतदार यादीत नवीन सेक्शन अॅड्रेस टाकणे, सेक्शन अॅड्रेस अद्यावत करणे त्यामध्ये दुरूस्ती करणे ईत्यादी बाबतचे काम विधानसभा क्षेत्रनिहाय नियुक्त पर्यवेक्षक व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत सातत्याने सुरू आहे. तथापि सदर काम अपेक्षित कालावधीत होत नसल्याने तसेच याकरीता नियुक्त केंद्रस्तरीय अधिकारी यांचेव्दारा घरो – घरी प्रत्यक्ष भेटी देउन अचूक माहिती संकलीत करून सविस्तर अहवाल व त्यानुसार दुरूस्ती करणेकरीता कार्यवाही यथावकाश होत असल्याने सदरची कार्यवाही अचूक व तातडीने विहित कालावधीत करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी उपस्थित बी.एल.ओ. व पर्यवेक्षक यांना सुचना दिल्या.
यावेळी झालेल्या आढावा सभेमध्ये अकोला मनपा उपायुक्त गीता वंजारी यांनी पर्यवेक्षक आणि बी.एल.ओ. यांचेकडून केलेल्या कामाचा आढावा घेतला. पुर्व विधानसभा मतदार संघातील नवीन सेक्शन अॅड्रेस व त्यासंबंधी सर्व्हेक्षण करण्याचे प्रमाण असमाधान कारक असल्याने आयुक्त यांनीयावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच सदर कामामध्ये हयगय करणा-या कर्मचा-यांविरूध्द शीस्त भंगाची कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्या.
यावेळी मनपा उपायुक्त गीता वंजारी, नायब तहसीलदार स्वप्नाली काळे, मनपा निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, प्र.स. मैथिली बोबडे, गोपाल बाहेकर यांसेसह पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची उपस्थिती होती.
अकोला मनपा समग्र शिक्षा अंतर्गत मनपा अधिनस्त शाळांची शिक्षण परिषद संपन्न.
अकोला दि. 13 सप्टेंबर 2023 – मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आज दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे अकोला मनपा अधिनस्त असलेल्या एकुण 32 मध्ये 5 केंद्रांतर्गत असलेल्या 230 शिक्षकांसाठी दोन सत्रामध्ये पहिल्या सत्रात मराठी व हिंदी माध्यमांसाठी आणि दुस-या सत्रात उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचा समावेश होता. सदर शिक्षण परिषद महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे तथा प्रशिक्षण संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली आहे.
या शिक्षण परिषदेच्या प्रारंभी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी अनिल बिडवे यांनी शिक्षण परिषदेचे मुख्य विषय पी.जी.आय. (Performance Greeting Index), एन एस ए ( National Achievement Survey) व अध्ययन निष्पत्ती व त्या आधारीत प्रश्न निर्मिती कौशल्य या विषयाचा समावेश का केला गेला हे स्पष्ट करीत सुलभकांनी जिल््ह्याला पी.जी.आय., एन एस ए स्थितीवर मार्गदर्शन करून येणा-या काळात अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अध्यापन कार्य कसे करता येईल आणि शाळातील गुणवत्ता कशी वाढवता येईल या मार्गदर्शन केले.
सदर परिषदेमध्ये उपस्थित सर्व शिक्षकांना तांत्रिक मार्गदशन तसेच उद्भवणा-या अडचणी संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याकरिता शिक्षण परिषदेला आमंत्रित सुलभक सहा.शिक्षिका अपर्णा ढोरे, विषय तज्ञ वैशाली शेंडे तसेच एल.एफ.ई. समन्वयक, आशिष देशमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला यांनी मार्गदर्शन केले.
सदर शिक्षण परिषदेच्या आयोजनासाठी मनपा शिक्षण विभाग आणि समग्र शिक्षा अभियान कार्यालयाचे लीना रामटेके कविता शर्मा, सफिया खान, भावना कांबळे, विकास ऊके, उमेश सोनोने, अविनाश फुटाणे आदि कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.