राधाकृष्ण विखे यांच्या पोष्टर ला चपला जोडे मारून जिल्हाधिकारी कार्यालय समोर सकल युवक धनगर समितीने केला निषेध
भाजप (BJP) नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीवरून शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा टाकल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती. मात्र, यावेळी आंदोलक शेखर बंगाळे यांना तिथे उपस्थित असलेले भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे (Narendra Kale) यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे धनगर समाजातर्फे संताप व्यक्त होत असून, धनगर समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत अकोल्यात आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर राधाकृष्ण विखे यांच्या पोष्टर ला चपला जोडे मारून सकल युवक धनगर समितीने निषेध करीत आंदोलन केलंय.