पत्रकार उन्नती च्या मार्गातील दुवा – आ .प्रकाश भारसाकळे

पत्रकार उन्नती च्या मार्गातील दुवा – आ .प्रकाश भारसाकळे

ए जे एफ सी पत्रकार मित्र संघटने चा जिल्हा मेळावा

मनोज भगत
ग्रामीण प्रतिनीधी तेल्हारा

– पत्रकार समाज उन्नती च्या मार्गातील महत्वाचा घटक आहे . समाजातील प्रगतीची रखडलेली चाक सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे . हा दुवा संघटीत असल्याचा प्रत्यय आज ए जे एफ सी च्या अकोला जिल्हा मेळाव्यात येत असल्याचे प्रतिपादन आ .प्रकाश भारसाकळे यांनी केले .ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटने च्या जिल्हा मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते .
या शानदार मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी जि प सदस्य सुलभाताई दुतोंडे तर प्रमुख अतिथी कृ ऊ बा स चे सभापती सुनील इंगळे पं स सदस्य गोकुळाताई महेंद्र भोपळे सरपंच वैशालीताई गणेश वानखडे उपसरपंच रमेश दुतोंडे ठाणेदार गोविंद पांडव सुरेश नाठे ए जे एफ सी चे केंद्रीय सदस्य निलेश पोटे प्रदेश कार्याध्यक्ष राहुल कुलट विदर्भ उपाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर जिल्हा अध्यक्ष किरण सेदाणी जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार चिंचोळकर वरिष्ट पत्रकार गणेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते . या वेळी प्रास्ताविकात ए जे एफ सी चे जिल्हा अध्यक्ष किरण सेदाणी यांनी राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना ए जे एफ सी च्या उपक्रमाची माहिती दिली .तसेच पत्रकार मित्र मेळाव्याच्या आयोजनामागचा उद्देश विषद केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले .या वेळी पत्रकारांच्या गुणवंत पाल्याचा गौरव प्रशस्तीपत्र गौरव चिन्ह देऊन करण्यात आला .दुसऱ्या सत्रात ए जे एफ सी संघटने चे केंद्रीय सदस्य निलेश पोटे प्रदेश कार्याध्यक्ष राहुल कुलट विदर्भ उपाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर जिल्हा अध्यक्ष किरण सेदाणी कार्याध्यक्ष राजकुमार चिंचोळकर जिल्हा उपाध्यक्ष मनीष भूडके अशोक झामरे अमर मुंडाले प्रशांत ठाकरे अमोल बढे ,जिल्हा सचिव प्रा .एल डी सरोदे संघटक रवी कोल्हे सरचिटणीस शामराव सुलताने हारूण देशमुख रितेश टिलावत सुनील धुरडे सचिन कोरडे तालुका अध्यक्ष स्वप्नील सरकटे जितेंद्र लाखो टीया शहरअध्यक्ष फारूख सौदागर शे जमीर आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच प्रा संतोष राऊत व मनोज भगत यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . या वेळी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल च्या कामांचा आढावा घेण्यात आला .संघटनेच्या पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले . या वेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत सन्मानित करण्यात आले मेळाव्याचे संचालन व आभार प्रदर्शन महेंद्र कराळे यांनी केले .या वेळी अकोला जिल्ह्यातील ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news