भोपळे विद्यालयात शासनाच्या समाजविरोधी निर्णयाविरोधात काळ्या फिती लावून शैक्षणिक कामकाज
मनोज भगत
हिवरखेड (प्रतिनिधी)
शासकीय शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती निर्णयाच्या निषेधार्थ आज दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक व कर्मचारी वर्गांनी काळ्या फिती लावून काळा दिवस पाळून शैक्षणिक व कार्यालयीन कामकाज पार पाडले.या दिवशी शिक्षक व कर्मचाऱ्यासह पालकांनी सुद्धा सहभाग नोंदविला. शासनाने शासकीय शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती निर्णय हा भविष्यातील घातक निर्णय असून या निर्णयामुळे समाजातील बहुजन, गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक हित धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात प्रत्येक सामाजिक घटकांनी विरोध दर्शविला पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना शैक्षणिक चळवळीत विद्यार्थीहिताय योगदान देणाऱ्या शिक्षण संस्था शिक्षक , कर्मचारी,पालक संघटना यांनी विविध स्तरावरून निवेदन देण्याची आवश्यकता आहे अन्यथा या निर्णय समाजावर लादला गेला तर समाजाची खूप मोठी शैक्षणिक हानी होऊ शकते.करिता सर्वांनी या निर्णयाचा निषेध करावा,असे आवाहन महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी केले आहे.