मेडशी येथे बैलपोळा सन उत्साहात साजरा करण्यात आला
मालेगाव@सोयल पठाण
मेडशी: पोळा हा सण श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या,पिठोरी अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यारा हा एक मराठी सण असून हा विशेषत: विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असतो.त्यामुळे आजच्या दिवशी बैलांना गावात प्रत्येक घरोघरी घेऊन जातात व तिथे बैलांची महिला कडून पूजा होते व गोड पुरण पोळी चा निवेद्य दिला जातो.मेडशी येथे प्रथमच उत्कृष्ठ बैल सजावट करणाऱ्या पशुपालकांना 1001रुपये रोख स्वरूपात बक्षीस सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांच्या कडून जाहीर करण्यात आले होते. पहिले बक्षीस प्रवीण देवीदास सोलणोर आणि द्वितीय बक्षीस आशिष सुरेश पाल ,शुभम रमेश पाल, यांची पंचासमक्ष एकमताने निवड करण्यात आली.तर ज्या पशुपालकांचे बैल सर्वात आधी मारुती मंदिर येथे पोहचेल अश्या पशुपालकाला सुद्धा बक्षीस जाहीर करण्यात आला होता.ह्यामध्ये प्रतीक राजेंद्र कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला .तर मंगलाष्टक म्हणणारे श्री. कैलास तोडकर यांना शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.तोरण बांधणी करणारे सर्पमित्र राजू साठे यांचे सुद्धा शाल श्रीफळ टोपी देवून सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच शेख जमीर शेख गणीभाई ,गजानन शिंदे,प्रदीप तायडे,उपसरपंच अमोल विजय तायडे ,ग्रा प सदस्य मूलचंद धनु चव्हाण,जगदीश नाईक,ज्ञानेश्वर मुंडे,कैलास ढाले,नितीन तायडे,उल्हास मेडशीकर,डॉ सतीश बाहेती,उल्हास घुगे,संतोष बहादुरे,धनराज चव्हाण,दिनेश यादव तंटामक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे,प्रफुल साठे, पञकार सोयल पठाण अजिंक्य मेडशीकर यांच्या सह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.तसेच मेडशी पोलिस चौकीच्या वतीने पोळा सण शांततेत पार पाडण्यासाठी चौख बंदोबस्त बजावला.
सोयल पठाण
मालेगाव तालुका प्रतिनिधी