पातूर शहरात बैल पोळा साजरा, शेतकरी खंरच राजा आहेका ?
एका शेतकरी युवकाने बैलाला झुलान ऐवजी वेगवेगळे संदेशात्मक फलक लावून दिला संदेश
जन जनात संदेश पोहचवूया बळीराजाला आत्महत्ये पासून वाचूया
आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते. खऱ्या अर्थाने शेतकरी यांचा सर्वात मोठा सन म्हणजेच बैल पोळा समजला जातो
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या बाळापूर वेश, खडकेश्वर वेस, तसेच मिलिंद नगर या तीन ठिकाणी पोळा भरत असून यामध्ये शहरातील असंख्य शेतकरी आपल्या बैलांना सजवून शहरातून मिरवणूक काढतात यावेळी एका तरुण युवक शेतकऱ्यांने गौवंश वाचवण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित फलक तयार करून या फलकाने बैलांना सजवून शहरातून मिरवणूक काढली यावेळी बँड बाजा ने असंख्य बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा