स्वतंत्रतासेनानी रामकृष्ण आढे जन्मशताब्दी साजरी करणार :सर्वोदय मंडळाचा संकल्प
——————————————
अकोला — महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष स्वतंत्रतासेनानी स्व. रामकृष्ण आढे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे .अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ या वर्षात सर्वोदय मित्र जोडो अभियान राबविणार असल्याची माहिती सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी दिली .
अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या मासिक सभेत बोलत होते .ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, भूदान मंडळाचे माजी संचालक वसंतराव केदार, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धन दादा खवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘ कापूस ते कापड ‘ अभियानाचे प्रमुख प्रल्हादराव नेमाडे यांनी उरळ येथे राबवलेल्या कापसावरील विविध उपक्रमाची माहिती दिली. केळीवेळी सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलराव हिवरे यांनी केळीवेळी येथे स्व.रामकृष्ण आढे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या प्रबोधन पर्वाची माहिती दिली.
साहेबराव पाटील तायडे यांनी तुलंगा येथे सर्वोदय विचाराचा जागर करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय सुरु केल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले.
सर्वश्री भाऊराव गावंडे ,केशवराव काठोळे, रामचंद्र राऊत बाभुळगाव, सर्वोदयमित्र अनिल मावळे,महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे सदस्य महेश आढे,गुरुचरणसिंह ठाकुर, आकाश इंगळे यांचेसह सर्वोदय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.