मनपातील हद्दवाड क्षेत्रातील कर्मचा-र्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न!  

मनपातील हद्दवाड क्षेत्रातील कर्मचा-र्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न!

बार बार मरने से बेहतर एक बार मर जाना असा निश्चय करीत सहपरिवार केला आत्मदहनचा प्रयत्न!

 

उपआयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन करते झाले शांत?

अकोला:-मनपातील हद्दवाडी क्षेत्रातील कर्मचार्यांनी बार बार मरने से बेहतर एक बार मर जाना असा निश्चय करीत सहपरिवार केला आत्मदहनचा प्रयत्न. महाराष्ट्र शासनाने सन 2016 / 17 मध्ये अकोला शहराची हदवाडीचा आदेश मंजूर करुन हदवाढ क्षेत्रातील कर्मचा-र्यांना हदवाढ सहित सेवेत समायोजन करण्याचे आदेश दिले होते. याआदेशानुसार हदवाढ झाली, मात्र हदवाढ कर्मचा-र्याना महानगरपालिकेत समायोजन केले नाही. त्यामुळे गेल्या सात वर्षापासून हदवाढ क्रुती समिती व्दारे आयुक्त यांना या आधी निवेदन दिला होता दि.04/09/2023 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यावेळी उपायुक्त प्रशासन यांनी दिले होते चर्चेचे निमंत्रण त्यानुसार चर्चा होऊन तसेच लेखी कळविण्यात आले होते हद्दवाढ कर्मचारी समायोजन बाबत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला यांचेकडे कार्यवाही सुरू असुन त्यांचे कडून कर्मचारी नियमित, अनियमित अहवाल प्राप्त झाल्यानंतर समायोजनाची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते मिळालेल्या आश्वासनानुसार आवश्यक असलेल्या मंजुर्या प्राप्त करून घेण्याबाबत १०-११ दिवसाचा वेळ दिला होता दि.०४/०९/२०२३ रोजी चे आंदोलन सहानुभूती पुर्वक व उचित कार्यवाही न झाल्यास दि.१५/०९/२०२३ रोजी आत्मदहन करण्यात येईल व त्यास जबाबदार महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन अधिक्षक, तसेच आयुक्त मनपा हे असतील या प्रकारचे सुधारीत निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण

पाठपुरावा करत निवेदन देण्यात आले होते. मात्र याची दखल न घेतल्यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचार्यांनी बार बार मरने से बेहतर एक बार मर जाना असा निश्चय करीत सहपरिवार आत्मदहन आंदोलन करण्याच्या पत्राने मनपा प्रशासनाची झोप उडाली होती.आज आंदोलन होणार असल्याने पोलीस प्रशासन,अग्निशमन दल सज्ज होते.आंदोलन कर्त्याला या आधी प्रशासनाने आंदोलन न करण्याचे पत्र दिले होते.त्यानुसार आंदोलनकारी आयुक्तांना भेटून चर्चा केली.आयुक्तांनी बिंदुनामावली मंजूर न झाल्यामुळे सध्या सेवेत समायोजन करता येत नसल्याचे सांगण्यात आले. मागील सात वर्षांपासून हाच विषय सुरू असल्यामुळे आज अकोला महानगरपालिकेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी आंदोलन कर्त्यानी अंगावर पेट्रोल घेतल्यामुळे यावेळी आंदोलनकर्त्यांच्या अंगावर पाण्याचा मारा करण्यात आला तसेच पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. पोलीस प्रशासनाने आंदोलन करत्यांना ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गेले होते. मात्र आंदोलनकर्त्यांच्या परिवारांनी मनपा परिसरात आपले आंदोलन सुरूच ठेवले. उपायुक्त प्रशासन गीता वंजारी यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांच्या परिवारासोबत चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर यानंतर आंदोलन करते शांत झाले. मात्र आंदोलनकर त्यांच्या परिवारांनी जर प्रशासन तसेच आयुक्तांनी आमच्या मागण्या पुर्ण नाही केल्या तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे आंदोलन कर्त्याच्या परिवारातील महिलांनी पुन्हा यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असे सत्य लढाशी बोलून दाखवले. परंतु प्रश्न असा आहे की मनपाचा आक्रुतीबंधानुसार 1509 पदे आस्तित्वात आहेत .ज्यामध्ये 982 पदे मनपातील कर्मचार्याची भरले उरलेले 527 पद ही अधिआरी, इंजिनिअर, आपरेटर,अश्या स्वरुपाची आहेत मग आयुक्त या आंदोलन करणार्या कर्मचार्याचे समायोजन कसे करणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.या आक्रुतीबंधानुसार मनपातील स्थाई 341 कर्मचारी शिल्लक आहेत मनपाने त्यांना व्यपगत पदावर ठेवले असुन यांना मनपात जागा नाही मग हदवाडीच्या कर्मचा-र्याना आश्वासन म्हणजे दिशाभूल तर नाही ना? आधी याचा खुलासा करण्यात यावा अशीही चर्चा आंदोलनकर्त्यांकडून होत होती. आयुक्तांनी वेळ मारुन नेली पुढे काय हे अजुनही गुलदस्त्यातच आहे. विशेष म्हणजे केद्र शासना चे परिपत्रकानुसार अस्थाई कामगारांना कमीतकमी 18 हजार रुपये पगार असायला हवा मात्र या हदवाढ कर्मचा-र्याना 7/8 तर कुठे दहा ते बारा हजार का देण्यात येतो? मग या कर्मचाऱ्यांवर अन्याय का? जर हदवाढ क्षेत्रातील कर्मचार्यांचे समायोजन प्रक्रिया झाली तर त्यांची सेवाजेष्ठता कायम राहणार का? सेवेत समयोजन केले तर पेन्शन मिळणार ? असे अनेक किचकट प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news