मुंडगावच्या श्रम प्रतिष्ठा दिनाचे मानकरी नयमतउल्ला बेग यांची जोडी

मुंडगावच्या श्रम प्रतिष्ठा दिनाचे मानकरी नयमतउल्ला बेग यांची जोडी

अकोट प्रतिनिधी

मुंडगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय अवधूतराव किसनराव उपाध्य भाऊसाहेब अंबडकार यांनी गेल्या सहा दशकापासून चालवलेली परंपरा आजतागायत सुरू असून यावर्षी च्या श्रमप्रतिष्ठादिनाचे मानकरी नाही मात्र बेग यांची सर्जा राजा या जोडीने मानाचे स्थान पटकावले मुंडगाव ग्रामपंचायत च्या सरपंच मीना उईके यांच्या हस्ते जोडीचे पूजन होऊन झुला चढवून व जोडी मालक वेग यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच मीना उईके, उपसरपंच तुषार पाचकोर, अकोट ग्रामीणचे ठाणेदार संजय खंदाडे, पीएसआय विष्णू बोडखे,पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, तंटामुक्ती राजेश वारकरी, पोलिस पाटील बाळासाहेब भगेवार, गजानन वारकरी, विलास ठाकरे, अरविंद फुसे, जुगलकिशोर चिंचोलकार, इम्रान खान, सुरेश गवई, अजित अहेमद, भास्कर पोहोरकार, नितीन गाडगे, भगवान गावंडे, अनिल गाढे, भिमराव सरकटे , सुरेंद्र खांन्देल, दीपक चिंचोलकार, राहुल भेले,अतूल काठोळे,पत्रकार कमलेश राठी, विशाल गवई स्वप्निल सरकटे, बीड जमदार भास्कर सांगळे, सचिन कुलट, राहुल कांबळे, होमगार्ड रूपाली पुनासे यांच्यासह
मुंडगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस एस अढाऊ यांनी सुदृढ जोडीची निवड केली. गेल्या साठ वर्षापासून ची ही परंपरा व ग्रामस्थांचा असलेला एकोपा अकोला जिल्ह्यात एक आदर्श म्हणावा लागेल श्रमप्रतिष्ठा उत्सव अत्यंत शांतता पूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news