विद्यार्थ्यांनी अनुभवली खरीखुरी निवडणूक
पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा
पातूर : पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल मध्ये अगदी खरी खुरी निरागस निवडणूक पार पडली. यामध्ये प्रचार होता, बॅलेट पेपर होते, आणि निवडणूक जिंकल्यानंतरचा आमंदही होता. नव्हते मात्र धूर्त राजकारण..!
विद्यार्थ्यांना लोकशाहीची संपूर्ण प्रक्रिया समजावी यासाठी पातुर च्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया राबवत असते. या शैक्षणिक सत्रासाठी नुकतीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये आचार संहिता, नामांकन अर्ज भरणे, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप, प्रचार करणे आदी माहिती या उपक्रमबाबत देण्यात आली. यांनतर निवडणूक केंद्र उभारण्यात आले. यामध्ये प्रत्येक क्लास मधून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी असे दोन प्रतिनिधी निवडून देण्यात आले. निवडून आलेल्या उमेदवारांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी स्वागत केले. यांनतर विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन विदयार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यामध्ये इयत्ता पहिलीमधून कनिष्का खंडारे, प्रणित डिवरे दुसरी मधून आस्था काळपांडे, सर्वेश ठाकरे तिसरीमधून बोधी खंडारे,संग्राम इंगळे, चौथीमधून सौम्या गहिलोत,समर्थ पाटील, पाचवी मधून आराध्या गव्हाळे, तनुष पाकदुणे, सहावीमधून सायली शेंडे, रुद्रा परमाळे, सातवीमधून गौरी इंगळे, युवराज बंड, आठवी मधून मनस्वी जाधव, प्रथमेश अमानकर, दहावीमधून क्रिस्टी चिकटे आदी विद्यार्थी विजयी झाले आहेत. तर इयत्ता नववीमधून प्रेरणा कांबळे, चक्रधर भगत तर दहावीतून प्रतीक अत्तरकर हे उमेदवार अविरोध विजयी झाले आहेत. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून यथार्थ चव्हाण, पूर्वा बंड यांनी काम पाहिले, तर मतदान अधिकारी म्हणून आदित्य राठोड, अलबर अहमद खान, मोहम्मद अम्मार शेख, श्रुती तायडे, अनुष्का घुगे,विधी बंड, यांनी काम पाहिले तर सुरक्षा निरीक्षक म्हणून सार्थक शेंडे याने जबाबदारी पार पाडली.
निवडणूक यशस्वी करण्यासाठीशाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरीश सौंदळे, उमेर अहमद, रविकिरण अवचार, अश्विनी अंभोरे, नीतू ढोणे, प्रियंका चव्हाण, योगिता देवकर, नयना हाडके, लक्ष्मी निमकाळे, तृप्ती पाचपोर, प्रीती हिवराळे, शितल जुमळे, अश्विनी वानेरे, शानू धाडसे , रूपाली पोहरे, शुभम पोहरे यांनी परिश्रम घेतले.