सार्वजनिक स्वाक्षरी अभियान
मुर्तीजापुर मतदारसंघातील खेड्या गावांच्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल जनतेचा जनआक्रोश स्वाक्षरी अभियान च्या माध्यमातून सुरू केला असून प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे, याचे आयोजन रुद्राक्ष राठोड मित्र परिवार चिंचोली रुद्रायणी आणि या अभियानाची सुरवात चिंचोली रुद्रायणी गावापासून सुरू करण्यात आले दरवर्षी प्रमाणे पुरातन काळापासून सुरू असलेली पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रुद्रायणी गडावर भाविक भक्त दर्शनासाठी येतात याचे औचित्य साधून हे स्वाक्षरी अभियान रुद्रायणी गडाच्या पायथ्याशी राबविले व जनतेने आपला संताप व्यक्त केला
गाव रस्त्यांची नावे-चिखलगाव ते रुद्रायणी माता मंदिर, जलालाबाद, वरखेड, वाघजळी, चिंचोली रुद्रायणी, राजनखेड, महागाव, जनुना, धाबा, पाटखेड, सोनगिरी ते बार्शीटाकळी.