‘’अमृत कलश’’ यात्रेत साठी शहरातील नागरिकांनी माती (मृदा) देउन सहकार्य करावे. – मनपा प्रशासन.
अकोला दि. 15 सप्टेंबर 2023 – केंद्र शासनाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव 12 मार्च 2021 पासून सुरू झाला असून आता याच उपक्रमाची सांगता म्हणून ‘’मेरी माटी मेरा देश’’ अर्थात ‘’माझी माती माझा देश’’ मोहिमेची संकल्पना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून करण्यात आली आहे. या अभियानाचा शेवटचा उपक्रम म्हणून ‘’अमृत कलश’’ यात्रा असून भारतातील प्रत्येक शहरामधून माती गोळा करून 28 ते 30 ऑक्टोबर पर्यंत देशाच्या राजधानीत विशेष रेल्वे द्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील 1 नोव्हेंबर रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक जवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या अमृतवाटीकेत या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल.
या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक घरातून माती (मृदा) संकलन करण्याकरिता झोन निहाय व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कलश यात्रे अंतर्गत माती (मृदा) संकलन करण्यासाठी आज पासून झोन निहाय मृदा संकलन रथ सुरू करण्यात आले आहे. दररोज सदरचे रथ झोन निहाय एक प्रभागात फिरणार अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ‘’माझी माती माझा देश’’ अभियानाच्या ‘’अमृत कलश’’ यात्रा उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात आपले सहभाग नोंदवून अमृत कलशासाठी माती देउन या देशस्वाभिमान जोपासण्याच्या कामामध्ये आपले सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे.