अकोला शहरातील लालबाग शहरात टाळ दिंडीच्या गजरात आगमन!
अकोला शहरातील माळीपुरा परिसरातील लालबाग राजाचे शहरात आज सायंकाळच्या सुमारास आगमन झाले आहे. गणरायाच्या आगमनामुळे गांधी रोड तिलक रोड परिसराती नागरिकांनी लालबाग राज्याचे फटाक्याची आतिषबाजी करीत मोठ्या उत्साहात स्वागत केले. विशेष म्हणजे गणरायाचा रथा गणेश मंडळातील महिलांनी सहभाग दर्शवला होता. यावेळी गणरायाच्या स्वागत टाळ दिंडी पताके अश्व सुद्धा श्री गणरायाच्या पालखीत उपस्थित होते.
यावेळी भक्तांनी लालबाग राजाचे स्वागत केले.