सालासर मंदिर परिसरात त्या दोन बिबट्यांचे मुक्काम!
अकोला शहरातील गंगानगर स्थित सालासर मंदिर परिसरात त्या दोन बिबट्यांचे मुक्काम असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. नुकतेच एका बिबट्याने हिंगणा रोड परिसरात एका व्यक्तीवर हल्ला चढविला होता. तेव्हापासून वनविभाग बिबट्याच्या शोधात आहे. आज गंगानगर येथील सालासर मंदिर परिसरात दोन बिबट्यांचे मुक्काम असल्याचे सीसीटीव्ही मध्ये काय झाले आहे. त्यामुळे या परिसरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागची टीम बिबट्यांचा शोध घेत आहेत.