रेल्वे प्रशासनाने काढलेले प्रवेशद्वाराचे नामफलक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज लावले.
येत्या सात दिवसांच्या आत डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार लागेल.
अकोला. गेल्या १२ जुलै २०११ रोजी रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी शहराच्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे २ प्रवेशद्वार उभे केले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने विकास करण्याच्या नावाखाली हे दोन्हीं प्रवेशद्वार काढून टाकले होते हे प्रवेशद्वार जसेच्या तसे विनाविलंब उभे करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महानगराच्या वतीने महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकांवर आंदोलन केले होते ..त्यावेळी रेल्वे प्रशासनाने तात्काळ ते दोन्ही प्रवेशद्वार उभे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने आश्वासन पाळले नाही म्हणुन आज पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर चे वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नामफलक लावण्यात आले आहे यावेळी येत्या सात दिवसांच्या आत डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार लागेल असा विश्वास अकोला रेल्वे प्रशासनाने दिला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली माजी नगर सेवक गजानन चव्हाण, योगेश गिते सह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.