अकोला जिल्ह्यातील
पातूर शहरातील घटना
रिपोर्टर किरण कुमार निमकंडे
पातूर शहरात झालेल्या अपघाताने शेतकरी पती-पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू
अकोला हैदराबाद नव्याने रोडचे काम सुरू आहे या रोड प्रशासनाने रोडच्या याकडे वरुन दुसरा बाजूला जाण्यास डिव्हायडरची व्यवस्था दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर ठेवल्याने दोन्ही कडेला असलेल्या शेतकऱ्यांचे चुकीच्या मार्गाने आपले वाहने व शेतात जाण्यास मजबूर व्हावे लागत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे व यामध्ये शेतकरी वर्गाला आपले जीव गमावा लागत आहे यामध्ये रोड प्रशासनाची हलगर्जी व दुर्लक्षपणामुळे जवळजवळ हा पाच ते सहावा अपघात या पंधरा दिवसांमध्ये घडला आहे आतापर्यंत या रोडवर अनेक तरुणांचा नाहक बळी गेला आहे पुन्हा
काल झालेल्या अपघातामुळे उपचारा दरम्यान पती-पत्नी यांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यातील ही पहिली घटना दुर्दैवी घडल्याने पती पत्नी यांना एकाच वेळी उपचारादरम्यान मृत्यू आल्याने दोघांना अग्नी देण्याची वेळ पातुर येथील निमकंडे परिवारावर आली आहे