सहदेवराव भोपळे विद्यालयात ई-पीक पाहणी कार्यशाळा संपन्न
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड – स्थानिक सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्व.ज्ञानदेवराव गिऱ्हे स्मृती सभागृहात शनिवार १६ सप्टेंबर रोजी ई-पिक पाहणी पेरा नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, संचालक प्रकाश खोब्रागडे, माजी केंद्रप्रमुख प्रकाश राऊत,कृषी सहायक मनोज सारभुकन, प्रदीप तिवाले, महेश इंगळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत, सलमान खान, दिपक कवळकार, गुंजन कोहळे, ,पत्रकार केशव कोरडे यांची उपस्थिती होती. संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांच्या संकल्पनेतून प्रेरित या कार्यशाळेबाबतचा उद्देश आपल्या प्रस्ताविकातून प्राचार्य राऊत यांनी सांगितला. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी भोपळे शैक्षणिक संकुलामध्ये अकराशेच्या वर बहुतांश शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत असून अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकपेरा ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येत नाही. करिता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शेतकरी पालकांना शेतातील पिकपेरा अँप च्या व्दारे नोंदविता यावा, यासाठी कृषी विभागाच्या सहकार्यातून सदर कार्यशाळा आयोजित केली. ई-पिक पेरा अँप व्दारे नोंद केल्यास शेतकऱ्यांना पिकविमा, शासकीय अनुदान, पिक कर्ज याशिवाय विविध शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. याकरिता शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन शेतकरी पालकांसाठी व परिसरातील इतर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. याप्रसंगी या कार्यशाळेसाठी कृषी विभागाच्या वतीने पुढाकार घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदविता यावा यासाठी शेतकरीहिताय कार्य करणारे तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत व उपस्थित कृषी सहायक यांचा यावेळी शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन अनिलकुमार भोपळे यांनी सत्कार केला. तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी विद्यार्थ्यी तसेच शिक्षकांना ई-पिक पाहणीबाबत मार्गदर्शन केले. एका मोबाईल व्दारे ५० शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद शक्य आहे. त्यांनी ई-पिक पाहणी महत्वाची असून ती येणाऱ्या १५ ऑक्टोंबर पूर्वी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करण्याचे आवश्यक असल्याचे यावेळी सागितले. त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्याच्या मदतीने शासनाचा कृषी विभागाचा अँप मोबाईल मध्ये इन्स्ट्रॉल करून प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यशाळेचे तथा संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी त्वरित नोंद करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन मयूर लहाने तर आभार निलेश गिऱ्हे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीते साठी महाविद्यालयातील प्राध्यापकगण निखील भड, गणेश भोपळे, दुर्गा बोपले, अमोल दामधर व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.