तुमच्या घरी पैशाचा खळखळाट असावा पण त्यामागे कुण्या गरिबाचा तळतळात नसावा – ह. भ. प. श्री गणेश महाराज शेटे

तुमच्या घरी पैशाचा खळखळाट असावा पण त्यामागे कुण्या गरिबाचा तळतळात नसावा – ह. भ. प. श्री गणेश महाराज शेटे

तिसरे पुष्प

अकोट प्रतिनिधी

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी आपल्याला आचार शिकवला, विचार शिकवला, व्यवहार शिकवला आपल्या जवळ भरपूर धन असावे पण ते धन वाम मार्गाने न येता सरळ मार्गाने आलेले असावे संत तुकाराम महाराज म्हणतात ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे/ उदास विचारे वेच करी// आपल्या घरात जर नीतीचे धन असेल तर ते धन तुम्हाला सुख, समृद्धी, समाधान प्राप्त करून देणार आणि जर अनीतिचे धन असेल तर तुमच्या घरी दिसायला बंगला, गाडी दिसेल पण त्या घरामध्ये मात्र नेहमी भांडण तंटे, रोगराई, कोर्ट कचऱ्या ह्या भांडगडी मागे लागलेला राहतील.
कारण एका ठिकाणी फार सुंदर शब्द आलाय ‘इमानदारी का पैसा मंदिर और फकीर आणि बेइमानी का पैसा डॉक्टर और वकील ‘ म्हणून तुम्ही धन कमावत असताना भरपूर कमवा पण कुणाचं अंतकरण दुखून, कुणाला बुडवून, कुनाला फसवून, कुणाला ठगऊन ते धन कमावू नका कारण आपल्या घरामध्ये लाखो रुपयांचा खळखळाट असावा पण त्या खळखळाटाच्या मागे कुण्या गरिबाचा मात्र तळतळाट नसावा असे प्रतिपादन ह.भ. प.श्री गणेश महाराज शेटे यांनी श्रीमद् भागवत कथेमध्ये तिसऱ्या दिवसाचे वाक पुष्प गुंफतांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news