गायरान जमिनी नियमाकुल करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडी तर्फे पातुर तहसिल येथे कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन…
■तालुका भरातील गायरान/अतिक्रमण धारकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
वंचित बहुजन आघाडी पातुर तालुक्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रमोद देंडवे जि. अध्यक्ष, मिलींद इंगळे जिल्हा महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली गायरान जमीन संदर्भात पातूर तहसील कार्यलय येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्च्यात पातुर तालुक्यामधील गायरान धारक, शासकीय, महसुल जमिनीवरील अतिक्रमणधारक यांनी मोर्च्यात संबंधितानी सहभागी व्हावे असे आवाहान पातुर तालुक्याचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ,महासचिव शरद सुरवाडे यांनी केले आहे.ज्यांनी गायरान जमिनी संपादीत केल्या आहेत परंतु अद्यापही त्यांना वहिवाटीसाठी जमिनीचे पट्टे मिळाले नाहीत, त्या सर्व जमिनधारकांनी सहभागी व्हावे.21 सप्टेंबर 2023 रोजी पातुर येथे गायरान जमिनधारकांनी मोर्चा मध्ये सामील होवुन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.मोर्चाला सुरवात संभाजी चौक येथून सकाळी 11 वाजता होणार आहे. गायरान जमिनीचा विषय गेली काही वर्ष सातत्याने चर्चेला जात आहे. त्याचे निरसन व्हावे म्हणून एल्गार उठवला आहे.असे आवाहन वंचीत बहुजन आघाडी युवक आघाडी,महिला आघाडी यांनी केले आहे.सदर मोर्चा तालुका अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.