पातुर येथे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते विवेक सागर नरेंद्र मोदी आणि आधारवड नरेंद्र मोदी या दोन पुस्तकांचे प्रकाशन

पातुर येथे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते विवेक सागर नरेंद्र मोदी आणि आधारवड नरेंद्र मोदी या दोन पुस्तकांचे प्रकाशन

पातुर येथील ज्येष्ठ कवी लेखक तथा अध्यात्मिक अभ्यासक गोविंद उपाध्य जी. एम. देशमुख यांनी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या विवेक सागर नरेंद्र मोदी आणि आधारवड नरेंद्र मोदी या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा 17 सप्टेंबर 2023 रोजी खानापूर रोडवरील उत्सव मंगल कार्यालयाचे सभागृहामध्ये पार पडला आहे
यावेळी या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून रणधीर भाऊ सावरकर प्रदेश सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र राज्य, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बळीरामजी सिरस्कार प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा
तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रख्यात लेखिका प्रतिमा ताई इंगोले उपस्थित होत्या तर मंचावर प्रमुख वक्ते आतिष सुरेश सोसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गहिलोत, भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस वैशालीताई निकम, चंद्रकांत अंधारे जिल्हा सचिव, देवानंद गहिले ज्येष्ठ पत्रकार सुप्रसिद्ध साहित्यिक, तुळशीरामजी बोबडे ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. शांतीलाल चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक पातुर, भाजपाचे पातुर तालुका अध्यक्ष रमण जैन, प्रेमानंद श्रीरामे,
शहर अध्यक्ष अभिजीत गहीलोत, काबरा साहेब,
ह भ प चक्रधर महाराज राऊत
यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमात कवी जी. एम. देशमुख आणि त्यांच्या पत्नी विजया देशमुख यांचा सापत्नीक सत्कार आमदार रणधीर भाऊ सावरकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, अंकुर साहित्य संघाचे वतीने देवानंद गहिले, भाजपाचे वतीने रमण जैन आणि सौ वैशालीताई निकम यांनी त्यांचा सत्कार केला आहे
याप्रसंगी माजी आमदार बळीरामजी सिरस्कार, आतिश सोसे, तुळशीरामजी बोबडे, आणि डॉ. प्रतिमा ताई इंगोले ज्येष्ठ साहित्यिक यांनी आपले विचार व्यक्त केलेत
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर बोदडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन गायक प्रकाश तायडे यांनी केले
तर स्वागत गीत पातुर येथील संगीत शिक्षक सुधाकर उगले आणि श्री तायडे सर यांनी सादर केले
याप्रसंगी माजी नगरसेविका तुळसाबाई गाडगे माजी नगरसेविका, सौ वर्षाताई बगाडे, शीलाताई आवटे, प्रिया कोथळकर, कल्पना खराटे, मंजुषा लोथे, रेखा गोतरकर, कपिल खरप, संदीप इंगळे, संदीप तायडे, भिका भाऊ धोत्रे, रामभाऊ गोळे, महादेव काटेकर, सचिन बायस, सचिन ढोणे, सचिन वारोकार, विठ्ठल काळे, प्रिया कोथळकर, विशाल देशमुख, सरपंच जहूर शेख, गणेश गिरी सर,
राजारामजी येनकर, आदीसह साहित्यिक कवी लेखक आणि भारतीय जनता पार्टीचे पातुर तालुका आणि शहराचे पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news