अकोला मनपा स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत विशेष मोहीम राबवून मोर्णा नदीच्या आजू बाजू परिसराची होणार स्वच्छता.
शासनाच्या सुचनेनुसार आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका व्दारा स्वच्छ सर्व्हेक्षण – 2023 अंतर्गत दि. 17 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमांतर्गत दि. 18 ते 22 सप्टेंबर 2023 पर्यंत दररोज सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत शहरातील मध्य भागातून वाहणारी मोर्णा नदीच्या राज – राजेशवर मंदीर ते गडंकी पर्यंतच्या आजू–बाजूच्या परिसराची मनपा अधिकारी/कर्मचारी यांच्या व्दारे विशेष स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात येणार आहे.
अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा शहरातील नागरिक सामाजिक संस्था तसेच ईतर संस्थांना आवाहन करण्यात येत आहे कि, अकोला शहर स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी या मोहीमेमध्ये सहभाग घेउन सहकार्य करावे.