मनपा प्रशासनाव्दारे शहरातील कच-याचे सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार!
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या घरात व प्रतिष्ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून शहरात ईतरत्र न टाकता मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच टाकावे, शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर पुर्णपणे बंद करावा. स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत आहे, तरी नागरिकांना मनपा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येत आहे यापुढे कचरा घंटा व्यतिरिक्त ईतर कोणत्याही ठिकाणी कचरा टाकू नये अन्यथा संबंधीतांवर मनपा प्रशासनाव्दारा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे कृपया याची नागरिकांनी नोंद घेउन फक्त कचरा घंटा गाडी मध्येच कचरा टाकून सहकार्य करावे. तसेच शहरातील नागरिकांनी कच-या संबंधीत तक्रार करावयाची असल्यास मनपाच्या 1800-233-5733 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे.