श्री नाथ नंगे महाराज संस्थान वाकळवाडी येथे भव्य महाप्रसाद
मालेगाव @सोयल पठाण मालेगांव तालुका प्रतिनिधी
मालेगाव:मालेगांव तालुक्यातील ग्राम वाकळवाडी हे नदी काठी व डोंगर खोऱ्याने वेढलेले आदिवासी बहुल छोटंसं गाव अतीशय निसर्गरम्य परिसरात असून येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भव्य महाप्रसादचे आयोजन दरवर्षी केले जाते.श्री नाथनंगे महाराज संस्थान वाकळवडी येथे गावातील सर्व गावकरी मंडळी मोठ्या आनंदात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मेडशी येथील श्री नागनाथ संस्थान वरून जय महाकाल कावड मित्र मंडळ वाकळवाडी हे पवित्र जल घेऊन वाकळवाडी येथील श्री नाथ नंगे महाराज संस्थान येथील शिवलिंगावर जलभिषेक करतात.या निमित्ताने येथे भव्य महा प्रसादाचे आयोजन केल्या जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा वाकळवाडी येथील भक्ता कडून सुरू आहे.गावातील सर्व गावकरी स्वयस्पूर्तीने आप आपल्या परीने महाप्रसाद करिता अन्न धान्य गोळा करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.या महाप्रसादाला मेडशी,मारसूळ, रिधोरा, कोळदरा,गोंधळवाडी सह परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.