मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष (SOD ) मंगेश चिवटे कडून सौरभ वाघोडे यांचा सन्मान.
अकोला: वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व जकारिया फाऊंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक हॉटेल ग्रीनलँड येथे अकोला, वाशिम, बुलढाणा या तीन जिल्ह्यांकरिता आरोग्य परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये रुग्णसेवक युवा वक्ते सौरभ गणेशराव वाघोडे यांचा मा. मंगेश चिवटे (विशेष कार्यकारी अधिकारी वैद्यकीय सहायता निधी कक्ष व विशेष कर्तव्य अधिकारी(OSD) मुख्यमंत्री सचिवालय) यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मा. आ.गोपिकिशन बाजोरिया, डॉ अमोल रावनकार, मा विठ्ठल सरप, डॉ. झिशान हुसेन, जावेद जकारिया आदी मान्यवर उपस्थित होते. सौरभ वाघोडे हे 24×7 रुग्णसेवेमध्ये कार्यरत असतात. अकोला जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांना त्यांनी तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रभरामध्ये रक्तदानाच्या माध्यमातून जनसामान्यांची गोरगरिबांची सेवा करत आहेत, विशेष म्हणजे सौरभ वाघोडे हे महाराष्ट्राचा महायुवा वक्ता या स्पर्धेचे विजेते आहेत. आपल्या वक्तृत्वच्या बळावर ग्रामीण भागात व्याख्यानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांन मध्ये ते रक्तदान करण्यासाठी जागृती करत असतात.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हान या खेड्यातील एक २३ वर्षाचा तरुण लोकांच्या मदतीसाठी जिवाचं रान करत असतो. सेवा परमो धर्म: गोर गरीब अनाथ, अपंग यांची सेवा करणे हाच आपला धर्म आहे. हे त्याचे ब्रीदवाक्य आज जील्हातील प्रत्येक तरुणाच्या ओठावर आहे.ज्या सोशल मीडियाचा वापर तरुण पिढी ही फक्त चॅटिंग आणि डेटिंग पुरता मर्यादित ठेवत आहे. त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सौरभ गरजू रुग्णांना रक्तदाते पुरवण्यासाठी वापर करत आहे. सौरभने आजपर्यंत ८ ते ९ हजार रुग्णांना रक्तदाते दिले आहेत. कित्येक गरजू रुग्णाचे मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेतून मंत्रालयातून पैसे मिळवून दिले आहेत, महात्मा फुले जन आरोग्य योजने मधून अनेकांच्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या आहेत. कुठलेही शासकीय रुग्णालय असो व प्रायव्हेट हॉस्पिटल असो त्या ठिकाणी एका फोन वर पोहचून गरजूंच्या अडचणी सोडविणे, डॉक्टर सोबत बोलून गरजूंच्या बिळात सवलत मिळवून देणे असे कार्य वाघोडे करत असतात. महत्त्वाचे म्हणजे अकोला जिल्ह्यातील तब्बल १३ थॅलेसेमियाग्रस्त मुले ज्यांना महिन्याला रक्ताची आवश्यकता असते अशी १३ मुले सौरभ ने दत्तक घेतली आहेत व त्या मुलांना दर महिन्याला तो रक्त उपलब्ध करून देतो. गावोगावी जिल्ह्यातील मोठं- मोठ्या डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत रोगनिदान शिबिरे आयोजित करून आजपर्यंत त्याने एक हजारपेक्षा जास्त गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत.