आजी आजोबांनी अनूभवल्या बालपणीच्या आठवणी

आजी आजोबांनी अनूभवल्या बालपणीच्या आठवणी,

बोरगाव मंजूत आजी आजोबा दिनाचे आयोजन

उज्वल पब्लिक स्कूलचा अभिनव उपक्रम

बोरगाव मंजू संजय तायडे

तालुका प्रतिनिधी सत्य लढा न्यूज नेटवर्क – आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस आयुष्यातील आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना आयुष्यातील शेवटची संध्याकाळ आनंदित जावी हेच ध्येय, परंतु संध्याची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता आई वडील आपल्या कामा निमित्त बहुतांश घरा बाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची जवाबदारी हि आजी आजोबा यांच्या वर असल्याचे वास्तव आहे, लहान मुलांना नात्याची नाळ व विद्यार्थ्यांची जडण घडण, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या उदांत हेतुने येथील एक मेव उज्वल डिजिटल पब्लिक स्कूल बोरगांव मंजू यांच्या वतीने शालेय स्तरावर आजी आजोबा दिनाचे आयोजन केले होते, या दिनानिमित्त आजी आजोबा यांनी विविध स्पर्धत सहभागी होत आपल्या बालपणीच्या आठवणी अनुभवल्या, सोबतच आपल्या चिमुकल्या नात व नातु यांच्या सोबत विविध खेळ संस्कृतींचा आपला अनुभव सांगितला,प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक नरेंद सोनोने (बोरगावकर) याच्या हस्ते विविध खेळ स्पर्धा प्रारंभ झाला,तर संचालिका उज्वला सोनोने, प्रशासकीय अधिकारी निता बोबडे आदी उपस्थित होते,
दरम्यान शालेय विद्यार्थी विविध पेहराव अंगिकारले होते, प्रसंगी आजी,आजोबा विविध स्पर्धत सहभागी होत,संगीत खुर्ची, थ्रो बॉल, एक मिनिट उखाणे, सहकार्य होत, खेळ स्पर्धत आजी, आजोबांनी बालपणीच्या आठवणी अनूभवल्या विशेष आजी आजोबा खेळत असताना त्यांच्या नातवंडांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून दिसत होता.नातवाचं आणि आजी-आजोबांचं हे विलक्षण नाते वेगळेच असते, नात्यांची वीण घट्ट जुळते व जडण घडण होते, तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा स्तरावर असे उपक्रम राबविले जातात हे कौतुकास्पद आहे,
असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सोनोने यांनी केले,
हा अभिनव उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत होन्हाळे, स्मिता पाटील , मीना वानखडे, शारदा देशमुख , अश्विनी माहुलकर , मोहिनी इंगळे, दिपाली देशमुख , दुर्गा असलमोल, साक्षी इंगळे, पूजा भराटे,पुनम पवार, शारदा जामनीक , प्रीती वाघमारे , स्वाती जैन आदींनी सहभाग घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news