बाळापूर येथे मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रा व स्वच्छता अभियान या ठिकाणी राबविण्यात आले मुख्याधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी.

बाळापुर शहरातील प्रत्येक वार्डातून माती संकलित करून नगरपरिषद कार्यालयात अमृत कलश मध्ये एकत्र जमा करण्यात आली
नगरपरिषद कार्यालयापासून ते स्तंभ चौका पर्यंत अमृत कलर्स यात्रा व स्वच्छता यात्रा या ठिकाणी काढण्यात आली.
बाळापुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव टाले यांच्या हस्ते या ठिकाणी हिरवी झेंडी दाखवून अमृत कलश यात्रेची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली
याप्रसंगी साने गुरुजी कला व सांस्कृतिक मंडळ पातुर यांच्या पथकाकडून पटनाट्य द्वारे माझी वसुंधरा 4.0 व स्वच्छ संरक्षण 2024 अंतर्गत ओला व सुका व धातू कचऱ्याचे विलगीकरण बाबत जनजागृती या ठिकाणी करण्यात आली.
यासाठी भजन मंडळी स्थानिक ढोल ताशे पथक यांच्या द्वारा मिरवणूक काढण्यात आली सदर कार्यक्रमात बाळापुर नगरपरिषद मधील सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृद्ध तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव टाले तसेच नगरपरिषद सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित होते
बाळापुर शहरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.
या यात्रेचा समारोप जयस्तंभ चौक येथे पटनाट्य व पंचप्राण शपथ सर्व नागरिकांना मुख्याधिकारी यांच्याकडून देण्यात आली.
यावेळी नगरपालिकेचे अभियंता सादिक अली कार्यालय अधीक्षक मोहम्मद अफसर एकादरी एपीओ अभियंता वैभव निंबाळकर नजीबुरहमान अंकुश कथले निखिल गुजर गोपाळ शिंदे सय्यद जावेद शहर समन्वयक मोहम्मद हाफिज आरोग्य निरीक्षक यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यात परिश्रम घेतले
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला