शासकीय आय टी आय पातूर येथे पीएम स्कील रन मॕरेथाॕन स्पर्धा व पदवीदान समारंभ थाटात संपन्न!
…. पुरुष गटात श्रीकांत गायकवाड प्रथम तर महिला गटात गायत्री शेंडे प्रथम…
…. महिला व पुरुष गटात स्पर्धा घेण्यात आली मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला प्रारंभ
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी तसेच तालूक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थी व १६ वर्षावरील सर्व महीला पुरुषांसाठी १७ सप्टेंबर ला सकाळी ७ ते ८ या वेळेत पीएम स्किल रन मँरेथाँन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आय टी आय ते पाच किलोमिटर पर्यतच्या परीसरात ही स्पर्धा पुरुष व महीला अश्या दोन गटात घेण्यात आली.मान्यवरांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक श्रीकांत ए गायकवाड(शा. आयटीआय पातूर),द्वितीय क्रमांक ऋषिकेश ए उपर्वट(शा. आयटीआय पातूर) तृतीय क्रमांक पुर्वेश डी उपर्वट (तु.का.विद्यालय पातूर) यांनी पटकावला तर महीला गटात प्रथम क्रमांक गायत्री एस शेंडे (देशभक्त तंत्र विद्यालय तांदळी)द्वितीय क्रमांक आरती बि जाधव(शा.आयटीआय पातूर) तृतीय क्रमांक दिपाली एस पांडे(शा.आयटीआय पातूर) यांनी पटकावला.विजेत्यांना प्रथम ३०००/-रू द्वितीय २०००/-रू तृतीय १०००/-रू पारितोषिक तसेच प्रशस्वीपत्र,मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
तसेच सत्र २०२२-२३ मध्ये अ.भा.व्य.अंतीम परीक्षा घेण्यात आली ज्यामध्ये विशेष प्राविण्याने उतीर्ण होणार्या प्रशिक्षणार्थांनसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये विवीध व्यवसायातील प्रशिक्षणार्थांना मान्यवरांचे हस्ते पदवी प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमांसाठी अध्यक्ष म्हणून श्री निलेश गवळे (शाखाधिकारी युनियन बँक आँफ इंडीया पातूर) प्रमुख पाहुणे म्हणून श्री आमित ठाकरे (कृषी अधीकारी पातूर)व संस्थेचे प्राचार्य एस पी भगत तसेच संस्थेतील निदेशक पि.टी.मेसरे सर, व्ही बी काकड सर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ पांडव मँडम, श्री जाधव ,श्री बोंबटकार सर , बाहेकर सर , पाटील सर , गव्हाळे मँडम तसेच ,चतुर्थे श्रेणी कर्मचारी नावकार, तायडे, माळोदे,पी जी इंगळे, अवचार मेजर, कराळे मेजर या सर्वाचे सहकार्य लाभले.
पीएम स्कील रन मँरेथाँन स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून युनियन बँक आँफ इंडीया पातूर यांचे तसेच स्पर्धकांसाठी पाणी बाँटल व अल्पोहारासाठी श्री रसीकलालजी धारीवाल खासगी आयटीआय आलेगाव ता.पातूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी