पेशवेकालीन न बारा बाई गणपती दर्शना करिता उसळली भाविकांची गर्दी!
जाणून घेऊया बाराभाई श्री गणेशाचा इतिहास!
अकोला शहरातील श्री राज राजेश्वर नगरीतील पेशवेकालीन बाराबाई गणपती दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे.पेशवेकालीन बाराभाई गणपती मूर्तीची काळया मातीतून पेशव्यांनी बनवलेली आहे. ही श्री गणेशाची मूर्ती पेशवे काळापासून तसेच ठेवल्या गेली आहे. गणेश चतुर्थीला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाची म्हणजेच बाराभाई गणपतीची स्थापना केली जाते. श्री गणेशाची मूर्ती ही1890 काळातली असून. पेशवे काळी ची श्रीगणेशाची असल्यामुळे या गणरायाच्या मूर्तीचे व्यवस्थित रित्या आजही जतन केल्या जात आहे. विशेष म्हणजे बारा बाई गणपती द्वारे कुठलीही देणगी न घेता सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम वर्षभर घेतल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.विशेष म्हणजे बाराभाई गणपतीच्या नावा मागे इतिहास असून बारा समाजाच्या बारा लोकांनी श्री गणेशाची स्थापना केली होती.तेव्हा या बारा समाजातील बारा लोकांनी बाराभाई गणपती असे नाव ठेवले होते. त्यातीलच जुने शहर स्थित भगवान दासजी इंगळे हे होते. आजही त्यांची पिढी बाराभाई गणपतीची स्थापना करीत आहे. तसेच भाद्रपद शुद्ध अनंत चतुर्थीला श्री गणेशाची पालखी उचलण्याचा मान जो आहे. तो भुई समाजाचा समाजाचा आहे. तसेच पारंपारिक वाद्य दिंडी हे वाद्य चौथ्या पिढीवर आजही निशुल्क सेवा देत आहेत. विशेष म्हणजे दिंडी वाद्य वाजवणारे हे श्री गणेशाच्या गळ्यातील हार व श्रीफळ घेऊन सेवा देत आहेत. अकोल्या शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे निघणाऱ्या मिरवणुकीत बाराबाई गणपतीला प्रथम स्थान दिले गेले आहे.