अकोल्या शहरातील अंडरपास हा गणेश घाट म्हणून घोषित करा सामान्य नागरिकांची मागणी!
राष्ट्रीय मामार्ग प्राधिकरण, पीडब्ल्यूडी कुंभकर्णी झोपेत!
अकोला शहरातील नव्याने बांधलेला अंडरपासा गणेश घाट म्हणून घोषित करण्याची मागणी अकोला महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे. अकोल्याचे लोकप्रतिनिधी यांनी मोठा गाजावाजा करत अकोल्या शहरात अर्धवट उड्डाणपुल तसेच अंडर पासची पासची निर्मिती केली होती. गेल्या वर्षभरात नवीन उड्डाणपुल चा काही भाग हा कोसळला तितकेच नव्हे तर ओपन थेटर ते टॉवर चौक पर्यंत अंडरपाची निर्मिती करण्यात आली आहे. या अंडर पास मध्ये बाराही महिने मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते त्यामुळे मार्ग बंद पडला आहे. आता तर हे पाणी अक्षरशः पंधरा ते वीस फूट पर्यंत जमा झाले असून. यावर्षी गणेश घाट म्हणून अंडरपास इथे गणेश घाट म्हणून घोषित करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय मामार्ग प्राधिकरण, पीडब्ल्यूडी कुंभकर्णी झोपेत आहे का! या अंडर पास मधील पाणी संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाही का! असे सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.महाराष्ट्रात नव्हे इतका टॅक्स अकोला महानगरपालिका सामान्य नागरिकांकडून पठाणी वसुली द्वारे वसूल केल्या जात आहे. मात्र सुविधा ह्या फक्त नावापुरत्याच असल्याचे सुद्धा नागरिकांकडून बोलल्या जात आहे.